आळंदी : आळंदी चाकण मार्गावरील ज्ञानेश्वर विद्यालयासमोरच्या रस्त्यावर आठ गाड्यांचे काचा फोडून 20 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबतचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजय काशिनाथ मुळीक (रा.म्हाळुंगे पाडळे,ता.मुळाशी,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दगड व लोखंडी गजाने आठ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. सुदाम सरंगल (रा.देहू फाटा ) यास सौरभ म्हस्केच्या भावाने मारहाणकेल्यामुळे 9 जणांनी दगडफेक केली. तसेच आठ गाड्यांचे काचा यावेळी फोडण्यात आल्या.याप्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे. .तपास पोलीस हवालदार महेश साळुंखे करीत आहे.