गळळास घेत केली आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात
यावल- तालुक्यातील आडगाव येथील 40 वर्षीय तरुण शेतमजुराने गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान प्रभाकर पाटील (40) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. आडगाव येथील समाधान यांनी 21 मे रोजी आपल्या राहत्या घरात पहाटे पाच वाजेपूर्वी घराच्या छताला दोरी बांधत गळफास घेतला. शेतमजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या समाधान यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकली नाही. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, आई, असा परीवार आहे. दरम्यान, समाधान यांच्यावर कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात असल्याचे सांगण्यात आले तर कर्जाच्या विवंचनेत ते व्यसनांच्या आहारी गेल्याची चर्चा आहे. यावल पोलिसात मयताचे वडील प्रभाकर बाबुराव पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संतोष सांगोळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तपास पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल सुनील तायडे हे करीत आहे.