घरासह गोठे जळाले ; आग विझवताना एक होरपळला
यावल– यावल तालुक्यातील आडगाव येथील सुमनबाई भगवान पाटील यांच्या राहत्या घरासह अन्य तिघांच्या गोठयास आग लागून 20 हजारांच्या रोकडसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री आग लागली. आग विझविताना नितीन प्रहाद साबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी पहाटे तहसीलदार कुंदन हिरे यांनी आडगाव तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
जिवीतहानी टळली
यावल-चोपडा रस्त्यावरील आडगाव येथील श्री मनुदेवी मंदिराच्या रस्त्यावरील सुमनबाई भगवान पाटील यांच्या राहत्या घरास बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. त्याच बरोबर मोतीराम पाटील, सुकलाल पाटील, गोकुळ पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यासह आगीची झळ बसली. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आगीनंतर ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत सुमनाबाई यांच्या घरातील 20 हजाराच्या रोकडसह धान्य, संसारोपयोगी वस्तू तसेच घराचे व गोठ्याचा मजला जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले. गुरूवारी तहसीलदार हिरे यांनी तातडीने आडगाव तलाठी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले.