यावल : तालुक्यातील आडगाव येथील शेतमजुरी करणार्या अजय उर्फ भीमा उत्तम इंधाटे (22) या तरुणाने घरी कुणीही नसताना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. अजय इंधाटे या तरुणाची आई गावाला गेल्यानंतर तरुणानी सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधत आत्म्हत्या केली. या प्रकरणी यावल पोलिसात धनराज गोंविंद बागुल (30, कळमगाव, ता.चोपडा) यांनी पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे.