किरकोळ वाद बेतला जीवावर : पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा
यावल : तालुक्यातील आडगाव येथे दोन कुटुंबात पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत मंगलाबाई युवराज न्हावी (48) या महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. मारहाण झाल्यानंतर महिलेला यावल शहरात उपचारार्थ आणत असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
किरकोळ वाद बेतला जीवावर
आडगाव येथील दोन कुटूंबात किरकोळ कारणावरून वाद होवून हाणामारी झाली. या मंगलाबाई युवराज न्हावी (48) यांना जोरदार मार लागल्याने त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.
पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा
अटकेतील आरोपींमध्ये दगडू खंडू कोळी (70), जिजाबाई दगडू कोळी (50), विनोद दगडू कोळी (32), सोनाली विनोद कोळी (29), सागर दगडू कोळी (25, सर्व रा.आडगाव) यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध भाग पाच. गुरनं.80/20 कलम 302, 323, 504, 506, 188, भा.दं.वि. सह मुं.पो.अधि. 135 चे उल्लंघण 37 (1) (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.