तिघे ताब्यात एक फरार
चाळीसगाव – तालुक्यातील आडगाव येथे चाळीसगाव डीवायएसपी पथकाने २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता छापा मारुन जुगार खेळणाऱ्या ३ जणांना १५६० रुपये रोकड सह ताब्यात घेतले असुन एक जण मात्र फरार झाला आहे. त्यांच्यावर मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आडगाव येथे जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी (ईआरटी) यांना मिळाल्यावरुन २२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथील प्लाटुनचे ४ कर्मचारी व डीवायएसपी कार्यालय पथकाचे पोलीस नाईक राहुल पाटील, पो.कॉ. तुकाराम चव्हाण यांनी दुपारी ४.१५ वाजता आडगाव गावी महादेव मंदीरासमोर झन्ना मन्ना नावाचा मांग पत्ती जुगार खेळणारे रविंद्र गुलाब पाटील, सुभाष शहादु पाटील, सुरेश आनंदा पाटील रा आडगाव ता चाळीसगाव यांना १५६० रुपये रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे त्यांच्या कडुन जुगार खेळण्याचे साहीत्य हस्तगत केले असुन जुगार खेळणारा रावसाहेब गोविंदा पाटील रा आडगाव हा फरार झाला आहे. वरील चारही जणांवर पोकॉ तुकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली आहे तपास हवालदार सुभाष पाटील करीत आहेत.
Prev Post
Next Post