आडमुठेपणामुळे महामंडळाचे लाखोंचे नुकसान

0

नवापूर (हेमंत पाटील)। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांच्या आडमुठेपणामुळे महामंडळाचे लाखो रूपयांचे नुकसान होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरातकडे जाणार्‍या बसेसची संख्या 24 तासांत 184 च्या घरात आहे. यातून केवळ बोटावर मोजण्या इतक्याच बसेस ठरल्यानुसार थांबा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरीत 90 टक्के बसेस दिलेल्या थांब्यावर न थांबता बायपासने रवाना करत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बस स्थानकावर बस आल्यावर ‘बस डायरेक्ट सुरत…बस मध्ये जाणार नाही, बायपास उतरावे लागेल’ अशी अनधिकृत दवंडीच दिली जाते. यामुळे प्रवाशांना बसमधून उतरून शेवटी गुजरात राज्यातील बस मधून प्रवास करावा लागतो.

सुरतच्या महाराष्ट्रीयन प्रवाशांची जादा बसेसची मागणी
गुजरात राज्यातील सुरत शहरातील उधना भागात रोजगार निमित्ताने नंदुरबार, धुळे,जळगाव, नाशिक, व उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खान्देशातील सात लाख पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन नागरिक वास्तव्य गेल्या पाच सहा दशकांपासून करीत आहे. गुजरात मधून महाराष्ट्र आपल्या गावी येण्यासाठी वर्षभरात ये-जा सुरू असते. लग्नसराई व उन्हाळी सुट्टी प्रवाशांची संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने बसेस भरगच्च भरून येत आहेत. यासाठी गुजरात राज्यातील सुरत कडे जाण्यासाठी जादा बसेसची मागणी करण्यात येत आहेत. जागा अभावी अनेक प्रवाशांचे भांडण होतात.

विद्यार्थी तसेच नागरिकांचे होतेय नुकसान
शेजारील गुजरात राज्यातील व्यारा जिल्ह्याचे ठिकाण आहे तर बारडोली ही मोठी बाजारपेठ असल्याने नंदुरबार, धुळे,अहवा डांग व तापी या चार जिल्ह्यातील बहुतांश लोक नवापूरहून गुजरात राज्यातील या प्रमुख शहरात दररोज जात असतात. तसेच सोनगड शहरातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी नवापूर दररोज ये-जा करतात यांना कॉलेज झाल्यावर घरी जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो. या विद्यार्थ्यांनी देखील सोनगड बस स्थानकावर न जात अनेकदा बायपास उड्डाणपूला जवळ उतरून दिले जाते. याठिकाणी वाहनाची मोठी वर्दळ असते. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून गेल्याने एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊ शकतो. पालकांनी अनेकवेळा तक्रार करूनही उपाययोजना झाली नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराई सुरू असल्याने प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. गुजरात राज्यातील सोनगड, व्यारा, बारडोली,या प्रमुख शहरातील बस स्थानकावर बस जात नसल्याने बायपास बस रवाना होत आहेत. त्यामुळे येथील प्रवासी महाराष्ट्र बस मध्ये न बसता गुजरात राज्यातील बसेस मध्ये प्रवास करीत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. काल दि 22 मे रोजी नवापूर सुरत बस सोनगड येथे न थांबता पुढे निघुन गेल्याचे प्रवाशांनी सांगितले त्यामुळे प्रवाशांचे फार हाल झाले याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

भर उन्हात महिलांसह बालकांचे हाल
महाराष्ट्र राज्यातील बसेस व्यारा शहरात न जाता बायपास रवाना होतात. एका महिला सुरतहून लहान मुलांसह सुरत- पैठण बस मधून व्यारा येत होती. व्यारा येण्याआधीच पाच किलोमीटर अंतरावर तिला महामार्गावरील बायपास चौफुलीवर उतरून दिले. महिलेने विनंती केली माझ्याकडे दोन बॅग दोन लहान मुले आहेत दुपारी दोन च्या सुमारास उन्हात कशी जाऊ रिक्षा देखील नाही.वाहक म्हणाला ’मुझे पता नही, बस तुम्हारे घरे पे आयी क्या ? एक्सप्रेस बस है अंदर नही जाएगी’ अशी उत्तर दिल्याने निराश झालेली महिलेला रखरखत्या उन्हात जावे लागेल. गुजरातकडे जाणार्या व येणार्‍या महाराष्ट्र व गुजरात राज्यातील बसेस पाच दहा मिनिटांचा विश्रांती व चहा-नास्तासाठी काही बसेस सोनगड, आनंदपुर, बेडकीपाडा येथे पाऊणतास पर्यंत थांबून प्रवाशांना ताटकळत ठेवतात. याठिकाणी हॉटेल चालकांनाकडून प्रवाशांची प्रचंड लुट केली जाते. हॉटेल मधील कोणातीही वस्तू घ्या आव्वाचा सव्वा भावाने दिली जाते. दर्जाही खराब असतो. नाईलाजास्तव प्रवाशांना महागडी वस्तू खरेदी करावी लागते. गुजरात राज्यातील बसेच रात्रीच्या वेळी नवापूर शहरात न येतात महामार्गाने बायपास रवाना होतात. तसेच पिंपळनेर-चरणमाळ मार्गे येणार्या बसेस रात्रीच्यावेळी पिंपळनेर चौफुलीवर प्रवाश्यांना उतरून देतात. अनेकवेळा प्रवाशी व चालक वाहकांना मध्ये बाचाबाची होते.यावर देखील गुजरात राज्यातील परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.