औरंगाबाद-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीवरील पुलावरून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता औरंगाबादमध्येच आणखी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे कोरड्या नदीपात्रात या तरुणाने उडी मारली असून यामध्ये तो जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे गुड्डू सोनावणे असं उडी मारणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी (२३जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, सोमवारी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे मराठा समाजाच्या नेत्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. दुपारी तीनच्या दरम्यान कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी