मुंबई: मालाडमधील आणखी एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मालाड येथील शिवसेनेचे शाखा क्रमांक ३९ चे माजी उपप्रमुख सचिन सावंत यांची रविवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हि घटना कुरारच्या गोकूळनगर परिसरात ही घटना घडली आहे.
हे देखील वाचा
गेल्या १५ दिवसांत राज्यात चार शिवसैनिकांची हत्या झाली आहे. यापूर्वीही ७ एप्रिल रोजी अहमदनगरमध्ये दोन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती तसेच शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आल्याची घटना समोर आली होती. हेच हत्यांचे सत्र अद्यापही सुरुच आहे. सचिन सावंत यांच्यावर रविवारी संध्याकाळी बाईकवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.