आणखी कठोर कारवाई करु

0

नवी दिल्ली । दहशतवाद्यांना मदत पुरवणारे पाकिस्तान जर आता सुधारले नाही, तर आणखी कठोर कारवाई करु, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला आहे. दगडफेक रोखण्यासाठी काश्मिरी तरुणाला जीपला बांधणार्‍या मेजर लितुल गोगोई यांचेही यावेळी नितीन गडकरी यांनी भरभरुन कौतुक केले. गडकरी म्हणाले, तत्कालीन परिस्थिती पाहून मेजर लितुल गोगोई यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करणं गरजेचं आहे.

शिरच्छेद करणार्‍याचा खात्मा
सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांचा शिरच्छेद करणारा दहशतवादी अबु अली शेराज ऊर्फ शेराज ऊर्फ इब्नी अबुल कारवाई दरम्यान मारला गेला आहे, अशी माहिती लष्करी सूत्रांनी आज (बुधवार) दिली. जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील घाटी सेक्टरमध्ये 1 मे रोजी जवान प्रेम सागर व परमजीत सिंह या दोन जवानांचा शिरच्छेद झाला होता. दहशतवादी अबु अलीने हे कृत्य केले होते. पाकिस्तानी लष्कराने त्याला मदत केली होती. या घटनेनंतर भारतीय नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. भारताने या घटनेचा बदला म्हणून पाकिस्तानचे बंकर उडवून दिले आहेत. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये अबु अली मारला गेला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमध्ये त्याचा मृतदेहसुद्धा शिल्लक राहिला नाही, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली