आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

0

मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठीचा अध्यादेश राज्य सरकारकडून आज किंवा उद्या काढला जाऊ शकतो.

सध्या मराठवाड्यासह विदर्भातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप पाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला. याआधी १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्याच्या एक दिवस आधीच ३१ ऑक्टोंबर रोजी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.