आणीबाणीपेक्षा सध्याची स्थिती भयंकर!

1

पुणे । इंदिराजींच्या काळात लागलेली आणाबाणी घटनेला धरून घटनेवर आधारलेली होती. परंतु, त्यापेक्षा आताची आणीबाणी भयंकर आहे. या आणाबाणीच्या विरोधात सर्वांना एकत्रित लढावे लागेल, असा एल्गार माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात केला. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारागृहातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी आयोजित मेळाव्यात त्यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. मी राष्ट्रवादी सोडणार नाही, असेही ते म्हणाले. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होेते. यावेळी छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालण्यात आली.

…और लाढेंगे भी
सर्व जाती-धर्म, राजकीय पक्षणीं एकत्र यायला हवे, पवारसाहेबांवर अजूनही लोकांचा विश्‍वास आहे. पार्टी चुकत असेल तर पार्टीत राहून चुका सुधारण्याच काम केले पाहिजे. अच्छे दिन येवो अथवा न येवो, पण पूर्वीचे होते. ते दिवस परत आले, तरी खूप झाले. अभि तो हम बचे भी है, और लाढेंगे भी, असा नारा देत आमच्यातील चुका दुरुस्त करून इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही, असा नारा भुजबळांनी दिला. तसेच, सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखणा जोर कितना बाजू ये कातिल मे है, असे म्हणत भुजबळ यांनी भाषणाचा समारोप केला.

म्हैस पाच फुटांची, रेडकू पंधरा फुटांचे
भुजबळ म्हणाले, न्यायदेवतेमुळे मी आज तुमच्यासमोर बोलत आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तून माझी चांगली बाजू मांडली. राज ठाकरेंनीही माझी चांगली बाजू मांडली. त्यासाठी त्यांचे आभार. तपास यंत्रणांनी माझ्या सर्व मालमत्ता जप्त केल्या, पण ते लोकांचे प्रेम जप्त करू शकत नाहीत. जेलमधून बाहेर आल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख जमा झाल्याचे आढळले. शंभर कोटींच्या कामात 850 कोटींचा गैरव्यवहार केला म्हणता, म्हणजे म्हैस पाच फुटांची आणि रेडकू पंधरा फुटांचे, असा शब्दात आपल्या आरोपांवर उत्तर दिले. आता शेतकरीच नाही, व्यापारी आत्महत्या करत आहेत. इतके चांगले दिवस आलेत. यापूर्वी गावात आत्महत्या होत होत्या आता मंत्रालयासमोर आत्महत्या होत आहे. मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माझा पाठिंबा आहे. परंतु, माझी प्रतिमा चुकीची केली गेली.