आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैश्‍विक स्तरावर व्यापक रणनिती आवश्यक

0

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली । आतंकवाद मुळापासून नष्ट करायचा असल्यास वैश्‍विक स्तरावर व्यापक रणनितीची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवादावर संयुक्त राष्टाची घोषणाही लवकरच लागू करण्यात येईल. यासाठी एक्वेटोरियल गिनीच्या मदतीची अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली आहे.

दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींनी आतंकवादी आणि त्यांच्या संगठण नेटवर्कच्या विरोधात ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. जगाच्या बदलत्या काळात दोन्ही देशांच्या सुरक्षेत तात्काळ आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचेही कोविंद यांनी यावेळी नमूद केले.