आतापर्यंत एकाही संन्यासाला भारतरत्न नाही; रामदेव बाबा यांनी व्यक्त केले खंत

0

नवी दिल्ली- काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावरून विविध क्षेत्रातील दिग्गजांची प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एकाही संन्याशाला भारतरत्न न दिल्याबद्दल योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी पुढील सरकारला एका तरी संन्यासाला भारतरत्न देण्याचा आग्रह केला आहे.

महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदजी किंवा शिवकुमार स्वामीजी यापैकी एकास सरकारने पुढील वेळी भारतरत्न देऊन सन्मान करावा असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल रामदेव बाबांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, प्रवण मुखर्जी यांना भारतरत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुकही केले. २०१९ मधील निवडणुकीत काट्याची टक्कर होऊ शकते. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका. देशाला शैक्षणिक, आर्थिक, चिकित्सक आणि अन्य गुलामगिरीतून स्वतंत्र मिळावा यासाठी संकल्प करा, असेही ते म्हणाले.