अहमदनगर : कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारचं असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. आता आंदोलनं नाही तर एक डिसेंबरला जल्लोष करा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाबाबत आश्वस्त केलं. अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मध्ये शेतकरी-वारकरी महासंमेलन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते
दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागासवर्गीय आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल सादर केला आहे.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला हात लागणार नाही अशी माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.