आता आली ‘खुशी’ची बारी!

0

मुंबई : स्टारकिड्मध्ये नुकतीच जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. आता यापाठोपाठ श्रीदेवींची मुलगी आणि जान्हवीची छोटी बहीण खूशी कपूरही आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार झाली आहे.

करण जोहरने नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी यंदा कोणते स्टारकिडस बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, असा प्रश्न नेहाने विचारला असता करणने क्षणाचाही विलंब न करता खुशीचे नाव घेतले. यावरून एक लक्षात आले की आता बॉलीवूडमध्ये खुशीची एन्ट्री होणार आहे.