आता कोरोना रुप बदलतोय, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

0

नवी दिल्ली – जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपले रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे. इटलीतील डॉ. अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आता आपली क्षमता गमावत असून तो कमी प्राणघातक होतो आहे. गेल्या १० दिवसात जे स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना व्हायरसची क्षमत कमजोर पडत असल्याचे दिसून आले आहे, असा खुलासा अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी केला आहे.

रशियाने बनवले नवीन औषध

रशियाने करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. पुढच्या आठवडयापासून रशियामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच विस्कटलेली आर्थिक घ़डी रुळावर येऊन सर्वसामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे. पुढच्या आठवडयापासून म्हणजे ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. हे मूळचे जपानी औषध आहे. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. पुढच्या दोन आठवडयात रशियाकडून बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले.