नवी दिल्ली : येत्या सप्टेंबरपासून 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. केंद्र सरकारनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, देशात पहिल्यांदाच दोनशे रुपयांची नोट चलनात येणार आहे. नोटाबंदीनंतर 50 आणि 200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे संकेत आरबीआयने दिले होते. त्यानुसार 200 रुपयांच्या नोटा चलनात येणार आहेत.
ऑगस्ट अखेरीपर्यंत सर्व बँकांमध्ये या नोटा पोहचतील. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोटा चलनात येणार असल्याची अधिकृत घोषणा भारतीय रिझर्व्ह बँक करेल आणि त्यानंतर या नोटा चलनात येतील, असे सूत्रांनी सांगितले. 200 रुपयांची नोट चलनात आल्यास ती फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे.