आता पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र

0

पुणे । आधाआता पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्रर नोंदणी गतीमान होण्यासाठी तसेच आधार नोंदणीसाठी नागरिकांना लांब जावे लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू केली आहेत. त्यामुळे आधार नोंदणी केंद्र कुठे याची शोधाशोध नागरिकांना करावी लागणार नाही.बँक खाते, गॅसचे अनुदान, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड आदींसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. याचबरोबर नावातील बदल, आधार कार्डमधील चुका, जन्मतारीख आदींमध्ये बदल करण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी होते.

अपुर्‍या मशीनच्या संख्येमुळे आधार नोंदणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत होती. त्यातच आधार केंद्र कुठे सुरू आहेत. याची माहिती नसल्याने काही आधार केंद्रांवर आधार नोंदणी अथवा दुरुस्तीचे टोकन घेण्यासाठी केंद्रांवर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आधार केंद्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या 16 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी नागरिकांना लांबच्या ठिकाणी जावे लागणार नाही. तसेच आधार नोंदणी अधिक वेगाने होणार आहे.

आठ दिवसांच्या पुढे टोकन देऊ नका
आधार नोंदणीसाठी आठ दिवसांपेक्षा अधिक दिवसांचे टोकन देऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने आधार केंद्र चालकांना दिल्या आहेत. जास्त वेळ लागणार असेल तर संबंधित केंद्र चालकांनी नागरिकांना दुसर्‍या केंद्रांवर जाण्याचा सल्ला द्यावा. जवळचे केंद्र कुठे आहे, याचेही मागर्दशन केंद्र चालकांनी करावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने आधार केंद्रचालकांना दिल्या आहेत.

50 युसीएल घेणार
सध्यस्थितीत आधार केंद्रांवर येणार्‍या नागरिकांमध्ये दुरुस्तीसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे. आधार नोंदणी आणि दुरुस्तीही एकाच मशीनद्वारे करण्यात येते. या मशीनद्वारे आधार दुरुस्तीसाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार दुरुस्तीसाठी जिल्हा 50 बायोमेट्रिक डिव्हास (युसीएल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत यासाठीची संगणक प्रणाली अपडेट करण्यात येईल. हे 50 किट येत्या शनिवारपर्यंत सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे आधारमधील दुरुस्तीचे काम फक्त पाच ते सात मिनिटांत होणार आहे.