आता ‘पोस्टमन’चा होणार ‘पोस्टपर्सन’

0

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीद्वारा ‘पोस्टमन’ हा शब्द बदलून आता ‘पोस्टपर्सन’ असे नामांतर करण्याची शिफारस टपाल खात्याकडे केली आहे.

टपाल खात्यात ‘पोस्टमन’ आणि ‘पोस्टवुमेन’ दोघेही कार्यरत असतात. मात्र सर्रासपणे पोस्टमन हाच शब्द प्रचलीत झालेला आहे. हा शब्द केवळ पुल्लिंगवाचक आहे त्यामुळे हा शब्द बदलण्यात यावा, अशी शिफारस या समितीतर्फे करण्यात आली आहे.