आता प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची होणार गणीत आणी इंग्रजी विषयाची गुणवत्ता क्षमता चाचणी . प्रकल्प अधिकारी अरूण पवार
यावल ( प्रतिनिधी ) शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व आदिवासी आश्रम शाळामधील विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी होणार असल्याची माहिती आदिवासी आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिकच्या वतीने कळविण्यात आल्याची माहीती येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे . त्या अनुषगांने यावल प्रकल्प कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील १७ शासकीय व३२ अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवता क्षमता चाचणी शैक्षणीक सत्र २०२३-२४ची पहीली क्षमता चाचणी दिनांक २९ ऑगस्ट२०२३ रोजी प्रत्येक शाळांवर होत असुन , गणित व इंग्रजी क्षमता चाचणी परिक्षेत इत्तया५वी ते १०वी मधील शासकीय आश्रमशाळामधील ३५२४ विद्यार्थी व अनुदानित आश्नम शाळांमधील ११०७२ विद्याथी असे एकुण १४५९६ विद्यार्थी क्षमता चाचणी परिक्षा देणार आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शैक्षणीक वर्षात तिन क्षमता चाचण्या घेण्यात येणार असुन . प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यावल अरूण पवार यांनी परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची पर्यवेक्षक म्हणुन जिल्ह्यातील प्रत्येक शाळावर नियुक्त केलेले आहे . तसेच भरारी पथकाची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे . शाळेतील मुख्याध्यापक यांची केन्द्र संचालक व शाळेतील एक शिक्षक यांची प्रश्नपत्रिका कस्टड़ीअन म्हणुन नियुक्ती केलेली आहे . याप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणात्मक विकास सातत्याने व्हावा यासाठी या परिक्षेचे नियोजन करण्यात केले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे . .