आता बाईपण बाजूला ठेवावे माणूस म्हणून जगावे..

0

शहादा। बाईने तिच्यातले बाईपण बाजूला ठेऊन माणूस म्हणून आत्मविश्वासाने जगायला शिकले पाहिजे. वयात येतांना होणार्‍या बदलांमुळे पालकांचा मुलीशी मोकळा संवाद झाला पाहिजे असे मत चाळीसगावच्या अनिंसच्या कार्यकर्त्या दर्शना पवार ह्यांनी मुलींशी संवाद साधतांना मांडले. बदलत्या वयात मुलींनमध्ये होणार्‍या शारीरिक व मानसिक बदलांवर मार्गदर्शन करण्यासाठी चाळीसगाव येथील अंनिस व सेवा दलाच्या कार्यकर्ती स्री व मुलींच्या प्रश्नावर काम करणारी दर्शना पवार हे विकास महाविद्यालयातील मुलिंशी संवाद सधायला आले होते. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती शहादा शाखेच्यावतीने गेली दोन दिवस 9 वीते 12 वीच्या विद्यार्थिनीशी संवाद साधुन त्यांचे प्रश्न समजून घेतले.

विरुध्दलिंगी माणसाबद्दलचे आकर्षण स्वाभाविक
वयात येतांना विरुध्द लिंगी माणसाबद्दलचे आकर्षण वाटणे स्वाभाविक असते,पण आपल्याला प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजला पाहिजे. नियमित मासिक पाळी त्यासंदर्भातील स्वच्छता व पाळीबद्दल समाजात असलेली अंधश्रध्दा समजावून सांगीतली.त्यांच्यात होणार्‍या शारीरीक व मानसिक बदल स्विकारत आत्मविश्वासाने वावरायला मुली शिकल्या पाहिजेत. योग्य आणि पोषक आहार,व्यायाम, खेळ,छंद जोपासले पाहिजेत. बाईपण बाजूला ठेऊन माणूस म्हणून आत्मविश्वासाने जगायला शिकले पाहिजे. वयात येतांना होणार्‍या बदलांमुळे पालकांचा मुलिंशी मोकळा संवादाबद्दल मार्गदर्शन केले. अंनिसच्या संगीता पाटील ,भारती पवार,भूमी शहा,नुपुर पाटील,वर्षा महाजन यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या शिक्षिका मंगला पाटील, रंजना पाटील यांनी सहकार्य केले.