आता बॉलीवूडमध्ये चालणार ‘सुई-धागा’ चॅलेंज

0

मुंबई: अनुष्का शर्मा आणि वरूण धवन यांचा आगामी ‘सुई-धागा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हे दोघेही सध्या विविध ठिकाणी जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कीकी चॅलेंजचं वारं पसरलं होतं. अनेकांनी हे चॅलेंज साकारले. आता अनुष्कानेही तिच्या ‘सुई-धागा’साठी ‘हॅशटॅग सुई-धागा चॅलेंज’ कलाकारांना दिले आहे. अनुष्काने हे पहिले चॅलेंज शाहरूख खानला दिले आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सुई मध्ये धागा घालताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करून तिने किंग खानला टॅग केले आणि त्याला हे चॅलेंज दिले.

https://www.instagram.com/p/Bn00PxkAoTB/?utm_source=ig_embed

अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडिओत वरूण धवनही तिच्यासोबत दिसत आहे. आता अनुष्काने दिलेले हे चॅलेंज शाहरुख खान कशाप्रकारे साकारतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.