आता राधे माँ दिसणार वेब सिरीजमध्ये

0

मुंबई: देश कितीही आधुनिक झाला तरीही अंधश्रद्धा ही कधी संपणार नाही हे भारतात नेहमी दिसून येते. याचेच उदाहरण म्हणजे, भारतात अध्यात्मिक गुरु मानली जाणारी राधे माँ आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिची ‘राह दे माँ’ नावाची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या वेबसीरिजमध्ये राधे माँ खुद्द मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजमधून राधे माँच्या आयुष्य दाखवले जाणार असून तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर आधारित ही वेबसीरिज असणार आहे. स्वतः राधे माँ ही वेबसीरिज प्रोड्यूस करत आहे. ट्रेलर लाँचच्या वेळीस राधे माँ अगदी मॉडर्न लूकमध्ये कार्यक्रमात पोहोचली होती.