जळगाव (सागर दुबे)। राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागोन घेतला असून याबाबतचे परिपत्रक 5 मे रोजी जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेट्या लावणे बंधनकारक राहणार आहे.
5 मे रोजी परिपत्रक जारी…
शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी सुरक्षित नसलयाची बाब शासनाच्या समोर आली आहे. यातच लैंगिंग लैंगिक छळ व अत्याचाराच्या घटना देखील वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा उपाय म्हणून तक्रारपेट्या लावण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार आता तक्रार पेट्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक 5 मे रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केले आहे.
शाळा प्रशासनाने करावयाची कार्यवाही
संबंधीत शाळा प्रशासनाने शाळेत तक्रार पेटी शाळेच्य दर्शनी भागात, प्रवेशद्वाराच्या नजीक, सबंधीतांच्या नजरेस येईल अशा रितीने लावावी. तक्रारपटी सुरक्षीत असावी, तक्रापेटी प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी. तक्रारपेटी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलिस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी. ज्या क्षेत्रात पोलिस पाटील उपलब्ध आहे. त्या ठिकाणी पोलिस पाटील यांच्या सेवा तक्रारपेटी उघतांना उपलब्ध करून घ्याव्यात. मात्र, ज्या ठिकाणी पोलिस पाटील अथवा पोलिस प्रतिनीधी यांच्या सेवा उपलब्ध करणे शक्य नाही अशा ठिकाणी प्रत्येक वेळी तक्रारपेटी उघडतांना पोलिस प्रतिनिधी उपस्थित असण्याबाबत आग्रह धरण्यात येऊ नये. गंभीर स्वरुपाच्या तक्रारीबाबत पोलिस यंत्रणेचे सहाय्य आवश्यक असल्यास तत्काळ घेण्यात यावे. संबंधीत शाळेतील महिला शिक्षक, विद्यार्थींनी यांच्या छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समिती समोर ठेवण्यात याव्यात, तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनीवरील अत्याचाराच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवण्यात याव्यात, तक्रार कर्त्यांचे नाव गुप्त राहिल व त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावयाची आहे.