आता सलमान पण लढणार लोकसभा निवडणूक ?

0

मुंबई : बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान मध्य प्रदेशात काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढणार आहे. आता या बातम्यांनंतर सलमान खान निवडणूकीत उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेते राकेश यादव यांनी सलमानला इंदौर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

सलमान खानचे तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे त्याला इंदौर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, तर इंदौरच्या तरुणांना फिल्म इंडस्ट्रीचा फायदा मिळेल, असे काँग्रेस नेते राकेश यादव यांचे म्हणणे आहे.