आता हवेली तालुक्याच्या विकासाला मिळणार चालना

0

शिरूर । हवेली मतदार संघातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 38 कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. यामुळे हवेलीच्या विकासाला चालना मिळणार आहे. तालुक्यातील रस्ते, शाळा आदींची दुरुस्ती होणार आहे.जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना आराखडा मान्य करण्यात आला. या निधीतून रस्ते, जोडरस्ता, साकव बांधण्यात येणार आहेत.

रुपणवरवस्ती साकव, थेऊर गणेशवाडी, महादेवमंदिर, कोलवडी, लोणीकाळभोर पाटीलवस्ती, शांतिकिरण सोसायटी, अँजेल हाय स्कूल, वाघुले वस्ती, जुना कॅनॉल, कुंजीरवाडी, उरुलिकांचंन गोबरगॅस वस्ती, टिळेकर वस्तीच्या विकासासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत.अष्टापुर पठारे वस्ती रस्त्यासाठी 30, केसनंद ते दुबेनगर 32.80, कासारी 40, रामा 55 ते पिंपळसुटी वडगाव 40, अण्णापुर ते झंझाडवस्ती रस्त्यासाठी 40, कोळगाव डोळस ते मांडवगण रस्ता 40, वडगाव ते शिरसगाव रस्त्यासाठी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले. केसनंद, वाडेगाव, गोतेमळा, अष्टापुर रस्त्यासाठी 1 कोटी 75 लाख, वाघोली-भावडी-तुळापूर रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख, कुंजीरवाडी तरडे रस्ता 1 कोटी 75 लाख, गोलेगाव करडे दहिवडी रस्ता 1 कोटी 5 लाख, अण्णापुर येवलेमाथा निमगाव रस्ता 1 कोटी 10 लाख, रामा 55 ते निमगाव म्हाळुंगी रस्ता 80, आलेगाव पागा ते उरळगाव रस्ता 80, लोणीकंद ते मुलसूदवस्ती 35, जाचकवस्ती ते कवडीवस्ती 25, केसनंद-तलेरानवाडी रस्ता 40, लोणिकंद डोंगरगाव रस्ता 35, फुलगाव पेरणे रस्ता 35, प्रयगधाम कोरेगाव मूळ 35 लाख, सोलापूर रोड ते तुपेवस्तीसाठी 30 लाख, तळेगाव ढमढेरे न्हावी सांडस 48, तळेगाव सनसवाडी रस्ता 40, महाजनमळा रस्ता 40, करडेलवाडी जोडरस्ता 37, रामा 55 ते बळोबाचीवाडी रस्ता 35, रामा 55 ते कोलपेवस्ती रस्ता 35, कोळगाव ते शिरसगाव रस्ता 55 लाख, शिरसगाव ते प्रजीमा 59 रस्ता 40 लाख, रामा 55 शिवतक्रार म्हाळुंगी 35 लाख, रामा 55 ते मांजरेवाडी रस्ता 35 लाख, रामा 9 ते लोनिस्टेशन डागरेवस्ती रस्ता 32 लाख, रामा 116 ते रायवाडी रस्ता 32 लाख, रामा 9 ते तुपेवस्ती रस्ता 30 लाख मंजूर करण्यात आले.

नवीन आरोग्य उपक्रेंदासाठी 1 कोटी
पारोडी, आंबळे, कासारी येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी, मांडवगण फराटा येथील जुने प्राथमिक आरोग्य केंद्र पाडून नवे बांधण्यासाठी 2 कोटी रुपये, निमोणे येथे कर्मचारी निवासस्थान बांधण्यासाठी 95 लाख, वाडेबोल्हाई येथील केंद्राच्या दुरुस्ती 25 लाख, चिंचणी उपकेंद्रात प्रसूतिगृह बांधण्यासाठी 25 लाख, आलेगाव पागा, निमगाव म्हाळुंगी उपकेंद्राला सरंक्षक भिंत बांधण्यासाठी प्रत्येकी 10 लाख, सरदवाडी, आंबळे, डिंग्रजवाडीत ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधण्यासाठी प्रत्येकी 12 लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेअंतर्गत शिरूर नगरपरिषदेला 2 कोटी 83 लाख, पिंपळे जगताप पांढरीचा ओढा, म्हातारीचा डोह येथे साठवण बंधारे बांधण्यासाठी अनुक्रमे 13 लाख 29 हजार व 18 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. स्मशानभूमीसाठी 16 लाख, विविध ठिकाणी दफनविधी बांधण्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांसाठी निधी देण्यात आला आहे.