आता २० ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी चक्री आंदोलन

0

पुणे-काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी २० ऑगस्टपासून मराठा बांधवांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ९ ऑगस्टला जे आंदोलन करण्यात आले त्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्यामुळे यापुढचे आंदोलन रस्त्यावर होणार नाही अशी घोषणा याआधीच करण्यात आली होती. त्यानुसार आता मराठा बांधवांनी आरक्षण आणि इतर सर्व प्रमुख मागण्यांसाठी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देणार केव्हा मुख्यमंत्र्यानी लेखी द्यावे,मराठा क्रांती मूक मोर्चाची मागणी यावेळी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरासह पुण्यात देखील ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे पोलीसांनी मागे घ्यावेत. तसेच आरक्षण केव्हा देणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी द्यावे.या मागणीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी २० ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालया समोर देखील करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयक समितीच्या शांताराम कुंजीर यांनी केली.