मुंबई- आरबीआय लवकरच नवीन २० रूपयांची नोट चलनात आणणार आहे. २०००, ५००, २००, १००, ५०, १० रूपयांच्या नोटा आधीच नव्या रंगरूपात सादर करण्यात आल्या आहेत.
नोव्हेंबर २०१६ पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिके अंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे.
३१ मार्च २०१६ पर्यंत २० रूपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज होती. जी मार्च २०१८ पर्यंत १० अब्ज झाली. या चलनातील नोटांची संख्या सध्या ९.८ टक्के इतकी आहे.