आत्मदहनाची नोटीस देताच हटविले अतिक्रमण

0

नवापूर: नवापूर तालुक्यातील मौजे खांडबारा येथील ग्रामपंचायत हददीतील रहिवासी हाजी इब्राहिम अरेबियानी व तैयब हबिब अरेबियानी यांचे अनधिकृत अतिक्रमीत बांधकाम काढून त्यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी 9 वा मुख्य अधिकारी जि.प नंदुरबार यांच्या दालनात आत्मदहन करणे बाबतची नोटीस फारूक युसुफ मेमन फारूक कादरी रा.खांडबारा यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिली होती. याची दाखल घेत 11 जानेवारी रोजी दुपारी रोजी तहसीलदार प्रमोद वसावे व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर खांडबारा गावात जाऊन ग्रामपंचायत हद्दीतील पोलिस स्टेशन समोरील अनधिकृत कम्पाऊंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केले.

यावेळी खांडबारा गावच्या ग्रामस्थांनी गर्दी केली होती. हे अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन विसरवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अवघ्या एका तासात संपूर्ण कपाऊंड जमिनदोस्त करण्यात आले. या प्रकरणी तहसीलदार प्रमोद वसावे यांनी तात्काळ कारवाई केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या कामी परिवेक्षाधिन तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,विस्तार अधिकारी दिलीप कुवर,ग्रामसेवक अशोक सुर्यवंशी,सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, अभय मोरे, दयाराम वळवी, किशोर बागुल, मानसाराम पाटील यांनी सहकार्य केले.