आत्मविश्वास हे कर्तुत्ववृक्षाचे मूळ-नरेंद्र चिरमाडे

0

सांगवी-आत्मविश्वास हे कर्तव्य वृक्षाचे मूळ आहे. वृक्षांची मुळे जेवढे जमिनीत खोलवर जातात तेवढी त्यांची ताकत वाढतच जाते, आपल्या आयुष्यातही विविध संकटांना तोंड देण्यासाठी भक्कम आत्मविश्वासाची गरज असते, असे मत नरेंद्र चिरमाडे यांनी व्यक्त केले.

लेवा पाटीदार मित्र मंडळाच्यावतीने डॉल्फिन इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा संपन्न झाला. नगरसेवक शारदा सोनवणे, नगरसेवक नामदेव ढाके, उद्योजक कुंदन ढाके, माई ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, राज सोमवंशी, मित्र मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, कार्याध्यक्ष डॉ.लीलाधर पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, विशेष प्राविण्य मिळविलेले उद्योजक, वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारी व नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट खान्देशी स्नेहभोजनाने झाला.

अध्यक्षीय भाषणात चिरमाडे पुढे म्हणाले, ‘सुगंधी’फुलांच्या दरवळ आसमंतात पसरविण्यासाठी योग्य दिशेने वाहत जाणाऱ्या वाऱ्याची गरज असते. परंतू सत्कृत्ये करणाऱ्या चांगल्या लोकांचा दरवळ पसरविण्यास कोणत्याही वाऱ्याची गरज भासत नाही. दुसऱ्याचे हित करण्यासाठी तत्पर असणारे सज्जन विनाशाच्या वेळीही कुणाशी वैर करीत नाहीत, अर्थात अहित चिंतीत नाही. चंदन वृक्ष तोडला जात असतांनाही कुऱ्हाडीची धार सुगंध करतो असे सांगितले.

भागवत झोपे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन पंकज पाटील व विष्णू चौधरी, आभार महेश बोरोले यांनी मानले. देवेंद्र पाटील, अशोक तळेले, विलास पाटील, प्रेमचंद पाटील यांनी संयोजन केले.