जळगाव । शेतकरी आत्महत्या जिल्हा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबियांना मदत करण्यासाठी गठीत समिती पुढे एकूण 23 प्रस्ताव विचारासाठी ठेवण्यात आले होते. त्या पैकी 15 प्रस्तावांना आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या बैठकीत मंजूरी दिली. या बैठकीचे संचलन अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री राहूल मुंडके यांनी केले. बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी प्रलंबीत प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याच्या सूचना संबधितांना दिल्या. शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करावी. असे शासन निदेश असल्याचे ही त्यांनी बैठकीत निर्देशनास आणून दिले. आगामी बैठकीत प्रलंबीत प्रकरणे सादर करण्याबाबत संबधीतांना लेखी सूचना द्याव्यात असेही शेवटी त्यांनी सांगितले. या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, भुसावळचे उपविभागीय अधिकारी चिंचकर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी श्री. वसंतराव महाजन, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी आदि उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबिय
महेश सुर्यकांत चौधरी, रा. भादली बु. ता. जळगाव, दिनकर कृपाराम वाणी, रा. बोरनार ता. जळगाव, धोंडू देविदास पाटील, रा. वाकडी ता. जळगांव, यशवंत जगदेव तायडे (पाटील), रा. नांद्राहवेली ता. जामनेर, धनराज महादू चौधरी, रा. पारोळा ता. पारोळा, केलस दिनकर पाटील, रा. मंगरुळ ता. पारोळा, पुडंलिक विक्रम पाटील, रा. गडगांव ता. पारोळा, सरदिप चुडामण पाटील, रा. जोगलखेडे ता. पारोळा, राहूल रमेश सोनवणे, रा. हातेड बु. ता. चोपडा, हरी डिगंबर पाटील, रा. चोरटक्की ता. चोपडा, राजेंद्र नारायण बाविस्क्र (पाटील), रा. चोपडा ता. चोपडा, विजय नथ्थु पाटील, रा. अडावद ता. चोपडा, समाधान भास्कर पाटील, रा. पातोंडा ता. अमळनेर, अंबादास सखाराम पाटील, रा. अंजनविहीरे ता. धरणगांव, गुणवंत काशिनाथ पाटील, रा. खौशी बु. ता. अमळनेर