आत्महत्या निराकरणावर आज सामूहिक चर्चासत्र

0

जळगाव । मानवाने अनेक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात प्रगती केली. पृथ्वीपासून तर अंतराळापर्यंत त्याने यशाची गरुडझेप घेतली. दुसरीबाजू जी अतिशय कमकुवत होतांना आपणास पहायला मिळते आणि ती म्हणजे त्याची मानसिकता. त्याला बदलण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण मानव वाचला तरच मानवतेला वाचवता येईल आणि म्हणून मानवाला वाचणे ही एक काळाची गरज बनली आहे. याचाच एक प्रयत्न म्हणजे आत्महत्येच्या समस्यांवरील निराकरणाकरीता चर्चासत्राचे आयोजन केले आहे असे जिल्हाध्यक्ष अतिक अहमद शेख यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या समस्येवर वेळीच लक्ष देऊन आपल्या बांधवांच्या मानसिक, आर्थिक व सामाजिक ताण-तणावांच्या जीवनात बौद्धिक व आत्मिक सुख देऊ घालणार्‍या सुनियोजित संकल्पना त्यांच्यासमोर मांडून त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे हिच आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जाकीर खान यांनी केले. यावेळी डॉ.जावेद यांचीही उपस्थिती होती.

या वक्त्यांचे लाभणार मार्गदर्शन
आत्महत्याच माझ्या समस्यांचे निराकरण आहे का? या विषयावर वहदत-ए-इस्लामी हिंद तर्फे 19 रोजी सकाळी 10.30 वाजता केमिस्ट भवन सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते जियाउद्दीन सिद्दीकी, अब्दुल वहाब मलिक, ज्येष्ठ पत्रकार विजय बुवा, वरिष्ठ रंगकर्मी शंभू पाटील व बी.डी.जडे सहभागी होणार आहे. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार त्र्यंबक कापडे, मिलींद कुळकर्णी तसेच हाजी गफ्फार मलिक, अ.करीम सालार व आसिफ खान उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.