यावल– लग्न न केल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी देत तालुक्यातील दहिगाव येथील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलिसात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात संशयीत देखील अल्पवयीन आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संशयीत पीडीत तरुणीचा पाठलाग करीत होता व 31 रोजी ती घरात एकटी असताना त्याने विनयभंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक एम.जे.मोरे व संजय चौधरी, संजय तायडे तपास करीत आहेत.