आत्महत्येच्या प्रयत्नातील मुलीचे नागरिकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

0

मेहरुणमधील जुन्या विहिरीजवळील प्रकार

समतानगरातील तरुणाची घटना ताजी

घरगुती वादामुळे उचलले पाऊल

जळगाव- घरगुती वादामुळे आत्महत्येचे पाऊल उचलून त्यासाठी मेहरुण परिसरातील उद्यानातील विहिरीत आत्महत्या करण्यास गेलेल्या 15 वर्षीय तरुणीचे अनिल सोनवणे या नागरिकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहे. रविवारी सकाळी 10 वाजेच्या प्रकारानंतर मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर सोनवणे यांचे कुटुंबियांनी तसेच पोलिसांनी आभार मानले.

मेहरुण परिसरातील अनिल सोनवणे हे नेहमीप्रमाणे सकाळी मेहरुणच्या उद्यानात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना उद्यानातील जुन्या विहिरीजवळ 15 वर्षांची मुलगी उभी दिसली. सोनवणे यांना मुलीबाबत संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी तिला विचारणा करताच तिने मेहरुण तलावाच्या दिशेन पळ काढला.

पाठलाग करुन पकडले अन् नेले पोलीस ठाण्यात
मुलीला विचारणा करताच तिने तलावाकडे पळ काढला. सोनवणे यांना मुलगी आत्महत्या करण्यासाठी आल्याची खात्री झाल्यावर त्यांनी तिचा पाठलाग केला. व मेहरुण तलावावर पोहचण्यापूर्वीच पकडले. तिला विचारणा केली असता घरगुती वादामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होती, असे सोनवणेंना सांगितले. सोनवणेंनी यानंतर एमआयडीशी पोलिसांनी संपर्क साधला.

अन् कुटुंबियांचा जीव पडला भांड्णात
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अतुल वंजारी, हेमंत कळसकर, रामकृष्ण पाटील यांनी मुलीला सोनवणे यांच्या सहकार्याने पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी मुलीची समजूत काढत, कुटुंबियांबाबत विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार मेहरुण परिसरातील आमीर कॉलनीतील कुटुंबियांशी संपर्क साधला. कुटुंबियांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. घरुन रागात निघून गेलेली मुलगी सुखरुप असल्याचे समजताच त्यांचाही जीव भांडण्यात पडला.

अनिल सोनवणेंच्या कुटुंबियांसह पोलिसांकडून आभार
दरम्यान रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास समतानगरातील तरुण तलावात बुडाल्याची घटना ताजी असताना याच दिवशी दुसरीकडे हा प्रकार घडला. अनिल सोनवणे वेळेवर पोहचले नसते, तर दुर्घटना घडली असती. त्यांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले. देवदूत ठरल्याचे सांगत कुटुंबियांनी यावेळी अनिल सोनवणे यांचे आभार मानले. दोन दिवसांपासून रामेश्वर कॉलनी परिसरातील अनोळखी मृत असलेल्या मिस्तरी नामक मयताची ओळख पटविणे कामीही तपास कामात भरत लिंगायत यांना सहकार्य करणार्‍या तसेच मुलीचे प्राण वाचविल्याबद्दल अनिल सोनवणे यांचे पोलीस निरिक्षकांनी कौतुक केले.