आदर्शनगरातील घरफोडी; दोन लाखांचा ऐवज चोरीला

0

रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
जळगाव – महाबळ परीसरात असलेल्या आदर्शनगरातील उज्ज्वल इंग्लिश स्कूलच्या मागे राहणारे कुटुंबिय बाहेरगावी असतांना अज्ञात चोरट्यांनी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर दरम्यान बंद घर फोडून घरातील सोन्या चांदीच्या रकमेसह 2 लाख 15 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात रामांनद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विलासचंद शिवनारायण बसेर (वय 66 वर्ष) रा. कविता अपार्टमेन्ट, आदर्शनगर, उज्ज्वल इंग्लिश स्कूलच्या मागे हे त्यांचे मुंबईत राहणारे मामा यांचे मयत झाल्याने त्यांच्या दारावर जाण्यासाठी मुंबईला हावडा मेलने 29 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता पत्नीसोबत गेले. त्यामुळे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून गेले होते. मुंबईत मामांच्या घरी असतांना अपार्टमेन्ट मध्ये राहणारे प्रमोद शाह यांनी फोन करून चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केल्याचे सांगितले. विलासचंद यांनी शालकाचा मुलगा अतुल मुदडा यांना चोरी झाल्याचे खात्री करण्याकरीता पाठविले असता चोरी केल्याची सांगितले. आज सकाळी पतीपत्नी घरी आल्यानंतर पाहिले असता चोरट्यांना सामान अस्तव्यस्त करत 52 हजार रूपये किंमतीच्या 25 ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, 15 हजार रूपये किंमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या, 15 हजार रूपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याच शिक्के, 15 हजार रूपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, 45 हजार रूपये किंमतीचे 30 ग्रॅम सोन्याचे तुकडे, 15 हजार रूपये किंमतीचे चांदीचे भांडे आणि 55 हजार रूपये रोख असे एकुण 2 लाख 12 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केली. विलासचंद शिवनारायण बसेर यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात भाग 5, गुरनं. 174/2018 भादवी 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.