नवापूर । शहरातील आदर्श नगरमध्ये नगर पालिके मार्फत पाण्याची पाईप लाईन,अंडर ग्राऊड गटारी व सिमेंटचे रस्ते बनवुन मिळावे अशी मागणी आदर्श नगरचा रहिवाशांनी मुख्याधिकारी यांना केली. आदर्श नगर येथे जवळ जवळ 75 टक्के लोकांनी स्वतचा प्लाँटवर घरे बांधली आहेत.तसेच प्रत्येकाने पिण्याचा पाण्यासाठी नगर परिषदेची पाईप लाईन नसल्याने प्रत्येकाने घरी बोरींग केलेली आहे.त्यामुळे या भागातील पाण्याची पातळी विहीरींना कमी होऊन काही घरांमध्ये पाणी येत नाही.त्यांना पाणी पिण्यासाठी बाटला खरेदी करावा लागतो.
निवेदनाचा आशय
या भागातील पिण्याचा पाण्यासाठी बांधलेली टाकी फुटलेली असुन तिच्या बर्याच वर्षा पासुन वापर करण्यात आलेला नाही.त्यामुळे या भागातील लोकांची पिण्याचा पाण्यासाठी गैरसोय होत असुन नगर पालिकेचे शुध्द पाणी आम्हाला प्यायला मिळत नाही. या परिसरातील बर्याच लोकांना आजार निर्माण होत असुन येथील रहिवाशी आजारी पडत असतात. या भागातील गटारी या उघडंया असुन त्यात प्रचंड घाण साचलेली असुन नगर परिषदेकडुन साफसफाई होत नाही.त्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या भागातील आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात गटारी व अंडर ग्राऊंड गटारी बांधुन देण्यात याव्यात.या भागातील रस्ते फक्त खडी टाकुन तयार करण्यात आले आहेत त्यावर सिमेंट व डांबरीकरण केलेले नसल्यामुळे रस्ते बांधुन मिळावेत.
यांची होती उपस्थिती
आदर्शनगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देतेवेळी अँड.भानुदास डी. कुलकर्णी, शाहदआब भाई, अँड.ऋतुल भानुदास कुलकर्णी, छोटलाल छगन चव्हाण, रवींद्र वसंत पवार,भास्कर केशव मोरे, भटू बंजारा,गुलाबीसींग वसावे,लक्ष्मण मिस्त्री, महेंद्र पाटील सर,किरण वसावे,अजय दिवटे,सुधीर त्रिभुवन,़फुलसिंग वसावे, इतर सर्व आदर्श नगर रहिवासी उपस्थित होते.