आदर्श नगरात किराणा दुकान फोडले

0

जळगाव । शहरातील आदर्शन नगरात असलेल्या सुखसागर किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री कुलूप तोडून दुकानातील 5 हजार रूपये किंमतीचा माल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून याबाबत रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, वैभव ज्ञानेश्‍वर डिमके यांचे रा. आदर्श नगरात राहते घर आहे. घराच्या दरवाजाच्या बाजूला एक लहानशे सुखसागर प्रोव्हिजन नावाचे किराणा दुकान आहे. त्यांचे राहते घर दुमजली आल्याने रात्री 11 नंतर घरातील सर्व मंडळी वरच्या घरात झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे कुलूप तोडून किराणा दुकानातील सामान अस्तव्यस्त करत 5 हजार रूपये किंमतीचा माल लंपास केला.