आदर्श प्राथमिक शाळेत गोवर रूबेला जनजागृती

0

बालकांना लसिकरण करण्याचे पालकसभेत आवाहन
चाळीसगाव – चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर येथील आदर्श प्राथमिक शाळेत आज गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेची जनजागृती विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये करण्यात आली. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी उपस्थित पालकांना गोवर रूबेला आजारांची सविस्तर माहिती देऊन इंजेक्शनची लस 14 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान पाल्यांना देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी नगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी माळी साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अशोक खलाणे, नगरसेवक रविंद्र चौधरी, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा खैरनार, मुख्याध्यापिका सौ.महाजन- खलाणे मॅडम, आरोग्यसेविका अर्चना जाधव आदींसह शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. खैरनार यांनीही उपस्थितांना गोवर रूबेलाचे मार्गदर्शन करून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अशोक खलाणे यांनीही सदर लसिकरणाचा लाभ संस्थेतील 100 टक्के बालकांना देण्यात येईल असे नमूद केले.

गोवरमुळे देशात वर्षाला 50 हजार बालके मरण पावतात तर रूबेलामुळे 2016च्या आकडेवारीनुसार सुमारे दिड लाख बालके मरण पावतात व गरोदर मातेला रूबेला झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळाला अंधत्व, मतिमंदत्व, मुकबधिरत्व व जन्मजात व्यंग येत असते.म्हणून गोवर रूबेला लसीकरणचा लाभ 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्वांना द्यावा तरच आजची पिढी भविष्यात निरोगी निर्माण व्हावी यांनी
आराखड्या नुसार प्रत्येक बालकाला आरोग्य केंद्रामार्फत लसिकरण करण्याचे नियोजन केले असून शालाबाह्य मुलांमुलीना देखील लसिकरण देण्यात येणार असून प्रत्येकाने आपल्या शेजारीपाजारींना याबाबत जनजागृती करावी, असे डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.
प्रत्येक बालकाला लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा असे नमूद केले.