आदर्श शेतकर्‍यांचा जि.प.तर्फे गौरव

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या सेस योजनेंतर्गत कृषि विभागातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील 15 शेतकर्‍यांचा अध्यक्षा उज्ज्वला पाटील व पदाधिकार्‍रांच्या हस्ते मोमेंटो, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व 5100 रुपये देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी शेतकर्‍यांनी स्वत:ची अवगत माहीती इतर शेतकर्‍यांना द्यावी, जि.प.अंतर्गत अनुदानाचा पॉलीहाउस, ग्रीनहाउस आदी योजनांचा लाभ घेऊन शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करण्राचे आवाहन केले. कृषी जिल्हाअधिक्षक विवेक सोनवणे यांनी शेतकर्‍यांनी कृषिरत्न, कृषिभुषण, शेतीनिष्ठ व महिलांनी जिजामाता महिला कृषिभुषण, आदी पुरस्कारांसाठी प्रयत्न करुन जि.प.च्या विविध कृषि योजनांचा लाभ घेण्राचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी शेतकर्‍यांनी गट शेतीला महत्व द्यावे असे मत व्यक्त केले. यावेळी शिक्षण क्रीडा सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सभापती रजनी चव्हाण, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते.

15 शेतकर्‍यांना पुरस्कार
हिरालाल शांताराम पाटील-दहिवद खु., संजय भास्कर भोसले-आमडदे, नारायण तोताराम पाचपांडे- साकरी, कैलास देवराम पाटील-वाकी, सोपान नथ्थु महाजन-बहाळ, मधुकर रामदास धनगर-वाकळी, जयदिप निंबाजी पाटील-साकरे, ईश्‍वरलाल चिंधु पाटील-दापोरी, अनिल जिवराम सपकाळे-करंज, अनुप प्रविण जहागिरदार-जामनेर, विरेंद्र दादाराव पाटील-सुकळी, नरेंद्र भिकारी पाटील-परधाडे, कन्हैया वसंत महाजन-तांदलवाडी, भगवान भानुदास पाटील-सावखेडा सिम, संजय सिताराम पाटील-टिटवी यांना कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले.सुत्रसंचालन आरोही नेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषि अधिकारी यांनी केले.