आदिवासी कुटुंबातील हरविलेली मुले सापडली

0

शहादा । तालुक्यातील कवळीद जवळील सोनवल त.ह.येथील 8 ते 14 वयोगटातील 5 आदिवासींची हरविलेली मुले होळगुजरी ता.शहादा येथे मिळून आली. शनिवारी सायंकाळी संजय लोटन पाटील यांच्या शेतात डाळींब तोडण्यास गेले असता पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून हाकलुन लावल्याने नवनाथ दिवान वाघ (08), गोपाळ राजेंद्र ठाकरे(05), सत्तार रमेश सोनवने (10), निखील आनंदा मुसळदे (14), अजय एकनाथ माळी (12) सर्व रा सोनवल तह ता शहादा हे गायब झाले होते.

मुलांचे आई वडिलांनी शहादा पोलिसात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांनी घटनेचे गांभीर्य घेऊन पोलिसांचे पथके तयार करुन सोनवल तह परिसरात बालकांचा शोध सुरू केला असता उपनिरीक्षक दिलीप बागूल यांच्या पथकाला ही सर्व मुले होळगुजरी ता शहादा येथे असल्याची माहिती मिळाली शेतकर्‍यांने या मुलांना हटकले असता ही सर्व मुले कारवाई च्या भितीने घाबरून मिळेल त्या रस्त्यावर धावू लागली. अखेर बरेच वेळ पायपीट केल्या नंतर रात्री 11-30 ते 12 वाजेच्या सुमारास आपण होळगुजरी या गावी पोहचल्याचे त्यांना लक्षात आले तेथे नवनाथ दिवान वाघ यास या गावात आपले नातेवाईक शरद दत्तू माळी हे रहात असल्याने ते पाचही मुले त्यांच्या घरी पोहोचले तेथे सर्वांनी जेवण केले व झोपले. अखेर पोलिसांनी या बाबतीत तपास करून या पाच ही मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. निरीक्षक संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप बागूल, कर्मचारी राहूल बोराळे, मनिलाल पावरा, दादाभाई साबळे , अफसर शहा, श्री पावरा यांच्या पथकाने केली.