यावलसह रावेर तालुक्यातील समाजबांधवांनी दिले निवेदन
यावल/फैजपूर :- विधानसभेत टोकरे कोळी समाजाविषयी 22 मार्च रोजी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली असून त्यात यावल व रावेर तालुक्यातील समाजबांधवांची बाजू मांडवी या आशयाची मागणी आमदार हरीभाऊ जावळे यांना तालुक्यातील टोकरी-कोळी समाजबांधवांतर्फे अकलूद टोल नाक्यावर निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व सभापती प्रभाकर सोनावणे उपस्थित होते.
आज विधानसभेत लक्षवेधी
यावल व रावेर विधानसभा मतदारसंघात फार मोठ्या संख्येन टोकरे-कोळी समाज आहे आणि या समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून ती आमदारांना माहिती आहे. अनुसूचित जमातीच्या एका गटाने खोटे पुरावे सादर करून विरोध दर्शविण्यास सुरुवात केल्याने 6 जुलै 2017 च्या निकालामुळे संपूर्ण टोकरे कोळी समाज व इतर 15 ते 20 जमाती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या संदर्भात 22 मार्च रोजी आमदार विकास कुंभार यांच्यासह अन्य आमदार विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहे. आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारसंघातील टोकरे कोळी समजाची बाजू मांडून लक्षवेधी वेळी हजर राहून चर्चेमध्ये भाग घ्यावा आणि बाजू भक्कमपणे मांडवी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर पाडळ्से, कासवे, कठोर, अकलूद, भोरटेक, दुसखेडा, रीधुरी,वनोली, कोसगाव, बमणोद, अंजाळा, म्हैसवाडी, चिखली, राजोरा, सांगावी, व परिसरातील समाजातील नागरिकाच्या स्वाक्षर्या आहेत.
यांची होती उपस्थित
जिल्हा परीषदेचे समाज कल्याण सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, प्रा.जतीन मेढे, भगवान सपकाळे, मीना तायडे, महेंद्र कोळी, जितेंद्र सपकाळे, राजेंद्र सपकाळे, अविनाश तायडे, विनोद कोळी, खेमचंद्र कोळी, विलास तायडे, योगेश साळुंखे, किशोर कोळी, नितीन तायडे, भगवान कोळी, सागर कोळी, सुधाकर कोळी व समस्त कोळी समाज बांधव उपस्थित होते. कोळी समाजाला न्याय देऊ, असे आश्वासन आमदारांनी प्रसंगी दिले.