शिरपूर(प्रतिनिधी) { शहादा रस्त्यावर वरुळ शिवारात शिरपूर कडे येणाऱ्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहादा तालुक्यातील वडाळी येथील गंभीर जखमी 38 वर्षीय युवकाचा धुळे येथे उपचारादरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात सोमवारी नोंद करण्यात आली आहे.गुलाबगीर शिवाजीगीर बावा रा.वडाळी ता.शहादा असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.तो 30 नोव्हेंबर 2021 रोजी मंगळवारी वडाळी येथुन दुचाकीने शिरपूर कडे येत असतांना शिरपूर तालुक्यातील वरुळ शिवारातील दिगंम्बर पांडू माळी फार्म लगत एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता.अपघातात गुलाबगीर बावा याच्या डोक्यास गंभीर दुखापत व अति रक्तस्राव झाल्याने त्यास तात्काळ डॉ.कदम यांनी तपासणी करून 108 क्रमाकांच्या अम्ब्युलन्सने धुळे येथे अधिक उपचारासाठी हलविले होते. तेव्हापासून त्याच्यावर ओम क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना 20 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास डॉ सैय्यद यांनी तपासणी करून मयत घोषित केले.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सोमवारी कागदपत्रे दाखल झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल चौधरी करीत आहेत.