फैजपूर । येथून जवळच असलेल्या वाघोदा बु. येथे आदिवासी तडवी भील एकता मंच व तडवी पंच कमेटीतर्फे 7 मे रोजी आदिवासी तडवी समाजाच्या सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
या सामुहीक विवाह सोहळ्यात समाजातील ईच्छुक वधु- वर यांचेकडुन अत्यंत माफक व कमी दरात (वधु- वरांना कपडे) साहित्य फक्त 786 रुपये विवाह नोंदणी फी घेवुन विवाह करवून दिले जाणार आहे. ईच्छुक वधु वर व नातेवाईकांनी विवाह नोंदणीकरीता आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तडवी पंच कमेटी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.