शिंदखेडा : श्रीशिप्रसचे महाविद्यालय शिंदखेडा येथे राज्यशास्त्र अभ्यास परिषदेमार्फत खान्देश आदिवासी युवा संसद या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उदघाटन शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे,प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी, उपप्राचार्य सी. व्ही. पाटील , आयोजक डॉ संभाजी पाटील ,प्रियांका घोरपडे, सुनंदा सोनवणे, प्रा जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
भीती दूर होण्यासाठी व्यासपीठ
उद्घाटनपर भाषणात नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांनी सांगितले की, आदिवासी युवकांनी स्वतःला कमी लेखता कामा नये. या परिस्थितीतही अधिकारी निर्माण झालेले आहेत. यासाठी इच्छाशक्ती महत्वाची असते. आयोजक डॉ. संभाजी पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमधील भीतीची भावना दूर व्हावी दुर होऊन त्यांनी व्यासपीठावर आपली प्रतिभा सादर करावी असे आवाहन केले.
संगणक प्रशिक्षणाचा लाभ घ्या
प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांनी सांगितले की, आजच्या युगात संगणकीय ज्ञान देखील गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात प्रफुल्ल कुमार सिसोदे यांनी सांगितले की, शिक्षण घेतांना आपल्या संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे व त्याची सांगड नैतिकतेशी घातली पाहिजे. दुसर्या बौद्धीक चर्चा सत्रात उपप्राचार्य डॉ महेंद्र पाटील(शिरपूर) यांनी व प्रा. विनय वाघ यांनी मार्गदर्शन केले.
145 विद्यार्थ्यांचा सहभाग
या युवा संसदेत चंद्रसिंग पाडवी, मंगेश ठाकरे सह इतर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. दीपक मराठे याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ही कार्यशाळा आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यशस्वीतेसाठी पंकज मोरे, विद्यार्थी विकास अधिकारी सचिन जाधव ईश्वर वसावे, वकील पाडवी मनीष ठाकरे,यांनी कामकाप पाहिले. या संसदेत 145 आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.