शिरपूर । धुळे व नंदूरबार जिल्हा आदिवासी विकास विभागची आश्रनिय कर्मचारी सहकारी पतपेढी लि. नंदुरबार या पतपेढीच्या चेअरमनपदी नंदू साबळे यांची तर व्हा. चेअरमनपदी विजय खैरनार यांची सर्व संचालक मंडळ व गट नेते आर.आर.पाटील यांनी बिनविरोध निवड केली. मावळते चेअरमन शरद सोनवणे व व्हा.चेअरमन जे.के.बागुल व संचालक मंडळ व डी.बी. बिरारीस यांनी पतपेढीच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित चेअरमन नंदू साबळे व व्हा.चेरमन विजय खैरणार यांची बिनविरोध निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
9 टक्के भागीदारी सभासदांना मिळणार
यावेळी गट नेते आर.आर.पाटील, शरद सोनवणे, जे.के.बागुल, सुधीर अकलाडे, जीवन चित्ते, दीपक चौधरी, दीपाली पाटील, सुधीर वळवी, सुरेखा वाघ-चौधरी आदी संचालक मंडळ व धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागतील आधिकारी व कर्मचारी हजर होते. पतपेढीची सर्वसाधारण वार्षिक सभा मावळते चेअरमन शरद सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली सर्व विषयावर खेळी मेळीच्या वातावरणत नंदुरबार येथे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आदिवासी विकास विभाग सेवेतून मार्च अखेर सेवानिवृत्त आधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ करून पतपेढीच्या वतीने निरोप देण्यात आला. पतपेढीचे गट नेते आर.आर.पाटील, मार्गदर्शक डी.बी.बिरारीस, प्राचार्य यांनी पतपेढीच्या प्रगतीचा लेखा जोका आपल्या मनोगत करून व्यक्त केला. शरद सोनवणे यांनी पतपेढीच्या नफ्यातून उद्यापासून 9 टक्के डिव्हिडंड वाटप सभासद यांना करण्यात येणार, असे जाहीर केले. यावेळी सूत्रसंचालन विजय खैरनार यांनी केले. तर आभार दीपक चौधरी यांनी मानले.