प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे ; रसलपूरच्या आश्नमशाळेला आयएसओ
रावेर :- आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शाळेत स्वच्छता, मुलांचे आरोग्य, जेवण, उत्तम दर्जाचे शिक्षण देणार्या शाळांनाच आयएसओचे मानांकन मिळतात, असे मत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी व्यक्त केले. रसलपूर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला आय.एस.ओ.मानांकन प्रमानपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अरूण पाटील होते. ओटाबु (सीपीएल) या संस्थेमार्फत आय.एस.ओ.मानांकन प्रमाणपत्र शाळेस प्रदान करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी विनोद पाटील उपस्थित होते.
डीजिटल शाळासाठी दिले प्रोजेक्टर
शाळा डीजिटल व्हाव्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून शिक्षक व कर्मचारी यांनी शाळेला प्रोजेक्टर देणगी स्वरूपात भेट देण्यात आले तसेच प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन सुध्दा करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यशस्वितेसाठी शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक बी.के.महाजन, शाळेचे व्यवस्थापक प्रभाकर पाटील, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचलन आरएन.पाटील तर आभार दीपक अटकाळे यांनी मानले.