आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे एफआरपीप्रमाणे ऊसाचे पेंमेंट बँकेत वर्ग

 नवापूर प्रतिनिधी 

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऊस गाळप ४६.०७२ मे. टन झालेले साखर ४२ हजार ७२५ क्विंटल उतारा सरासरी ९.७७ आहे. डोकारे येथील द्वारकाधिश साखर कारखाना संचलित आदिवासी सहकारी साखर

 

कारखाना सुरुपसिंग नाईक नगर लि. कारखान्याने गळीत हंगाम २०२१ २२ साठी १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२१ पर्यंतचे गळीत झालेल्या ऊसाचे पेमेंट एफआरपीप्रमाणे एक रक्कमी प्रती मे.टन दोन हजार ५२५ रुपयेप्रमाणे बँकेत वर्ग केले आहे.

 

» ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी सर्व बँकांशी संपर्क साधुन आपल्या खात्यावर ऊस पेमेंट जमा झाल्याची माहिती घ्यावी. आपला ऊस नोंदणी केल्याप्रमाणेच ऊसाची तोडणी करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकी गट ऑफिसशी संपर्क साधावा. कोणीही ऊस तोडणीबाबत घाई करु नये. कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यात येईल, असे आवाहन राशि साखर कारखान्याचे अध्यक्ष सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव, आदिवासी सहकारी कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, एक्झिक्युटीव्ह संचालक विजयानंद कुशारे यांनी केले आहे.