आदेश बांदकरांनी काढली शहरात रॅली

0

जळगाव । ‘होम मिनीस्टर’ फेम आदेश बांदेकर आज शिवसेनेच्या प्रचारासाठी शहरात आले होते. सकाळी 9 वाजेपासून शहरातील विविध भागांतून त्यांची शिवसेनेच्या उमेदवारांसाठी रॅली काढली. यावेळी आंदेश बांदेकर यांनी विविध प्रभागातील घरोघरी जाऊन महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडून महिलांशी थेट संवाद साधला. महिलांनी त्यांचे भावजी प्रत्यक्ष त्यांना भेटायला आल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. याप्रचारास शिवसेनेचे संजय सावंत, माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, सेना जिल्हा प्रमुख गुलाबाराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा आदी उपस्थित होते.