मुंबई- अभिनेता आदेश बांदेकर यांच्या ‘झिंग झिंग झिंगाट’ मालिकेच्या सेटला आग लागल्याची घटना घडली आहे. चेंबूर येथील एसेल स्टुडिओत आदेश बांदेकर यांच्या मालीकीची शुटींग सुरु आहे. आज दुपारच्या सुमारास ही आग लागली. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत मालिकेच्या सेटचे मोठे नुकसान झाले.
सेटवर जवळपास १०० ते १५० लोक उपस्थित होते. त्याचवेळी अचानक ही आग लागली.